प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. ८ इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेच्या उपाध्यक्षा सौ सुनंदा महावीर चौगुले यांच्या निधनाने एक व्यापक समाजभान असलेली जुनी जाणती वृत्तपत्र पत्रलेखिका आपण गमावली आहे.सुनंदा चौगुले या धडाडीच्या महिला पत्रलेखिका होत्या.त्यांनी विविध नागरी विषयांवर सातत्यपूर्ण धाडसी पत्रलेखन केले.तसेच स्त्रियांचे प्रश्न व समस्या प्रभावीपणे पत्रलेखनातून मांडल्या.पत्रलेखनाबरोबच त्या कथा - कविताही लिहीत असत.एक जबाबदार सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सुनंदा चौगुले यांच्या मोठी समाजिक हानी झाली आहे असे मत इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सुनंदा चोगुले अभिवादन सभेत व्यक्त झाले. समाजवादी प्रबोधिनी येथे झालेल्या या सभेत सुनंदा चौगुले यांनी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेसाठी दिलेले योगदान,त्यांची संघटनेप्रती आत्मीयता, सामाजिक बांधिलकी,त्यांच्यातील माणुसकी व आपुलकी बाबतच्या आठवणी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी प्रसाद कुलकर्णी,पांडुरंग पिसे,मनोहर जोशी,अभिजित पटवा,राकेश शेटके,दिपक पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र जाधव, बाळासाहेब नरशेट्टी,दिगंबर उकिरडे,हर्षद हुल्ले,विजय हावले,शितल चौगुले,नीलिमा हुल्ले,साक्षी चौगुले, मीनाक्षी हुल्ले, बाळासो हुल्ले उपस्थित होते.