गुरुवारी डॉ.निशा मुढे यांचे व्याख्यान



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी ता. २१  वृत्तपत्र पत्रलेखक संघ, इचलकरंजी या संघटनेच्या चोविसाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवाद शास्त्रविभाग प्रमुख प्रा. डॉ.निशा मुढे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. 

"वृत्तपत्र पत्रलेखन व माध्यमातील बदल " हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.हे व्याख्यान गुरुवार ता.२३ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे.या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान इचलकरंजीच्या नगराध्यक्षा मा. ऍड.अलकाताई स्वामी भूषवणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून होणाऱ्या या व्याख्यानाला जिज्ञासू नागरिक बंधू-भगिनी उपस्थित रहावे असे आवाहन वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे व सचिव मनोहर जोशी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post