प्रेस मीडिया वृत्तसेवा : आनंद शिंदे :
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई शहरात अनेक ठिकाणी एकाच मुलीवर २७ ते २८ जणांनी अनेक ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला. महाराष्ट्र मध्ये दोन आठवड्यात सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. मानव जातीला काळीमा फासणारी कृत्य या तरुण आरोपीनी केले आहे या घटनेमुळे महाराष्ट्र बरोबर संपुर्ण देश हादरला आहे. या देशात कडक कायदे असून सुद्धा कायद्याला आवाहन केल्या सारखे आहे म्हणून कारवाई होताना दिसत नाही.अशा प्रकारचे गुन्हा करणार गुन्हेगार जायबंदी होत नाहीत.
आमचे महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की आपण व या राज्याचे गृहमंत्री मिळून असे कृत्य करणाऱ्या आरोपी विशेष कायदा करून आरोपीना फाशीची शिक्षा तात्काळ झाली पाहिजे व पंडित मुलगीला न्याय द्यावा परत असा गुन्हा करताना गुन्हेगाराने दहा वेळा विचार केला पाहिजे .