प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने इचलकरंजी शहर व परिसरातील घरगुती गणपती व सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केल्यामुळे अनंत चतुर्थ दिनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन पंचगंगा नदी ऐवजी शहापूर खाण येथे आनंदाने आणि उत्साहाने केले.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक मा.जयश्री गायकवाड मॅडम,प्रांत मा श्री डॉ विकास खरात,पोलीस उपअधीक्षक मा.श्री.बी बी महामुनी,तहसीलदार श्री पाटील,इनप मुख्य अधिकारी श्री ठेंगल,नगराध्यक्षा सौ अलका स्वामी,उपनगराध्यक्ष मा श्री तानाजी पवार,शिवाजीनगर,गावभाग,शहापूर पोलीस ठाण्याचे सर्व प्रभारी अधिकारी,शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी चे प्रभारी अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर होमगार्ड आणि पत्रकार बंधू यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे 2021चा गणेशोत्सव शांततेत व उत्साहाने पार पडला.कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही*.
शहरातील व ग्रामीण परिसरातील या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आनंद सर्व नागरिक व गणेशभक्तांनी घेऊन पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त केल्यामुळे सर्व गणेशभक्तांचे आभार मानावे तितके कमीच आहे.