प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकंरजी प्रतिनिधी :श्रीकांत कांबळे
तारदाळहुन शहापुरकडे जाणारा रस्ता असुन सदर रस्त्यावरुन माेठ्या प्रमाणात रहदारी असते.कारण तारदाळहुन इचलकंरजी कडे कामानिमित्त जाणार्याची संख्या माेठ्या प्रमाणात असुन यामध्ये बांधकाम कामगार सेंट्रीग कामगार प्लंबर, सुतार कामगार शेतकरी व नाेकरदार वर्ग या रस्त्यावरुण प्रवास करित असतात.
तारदाळ शहापुर रस्त्याचे काम गेल्या 10 ते 12 वर्षानंतर गेल्या पाच ते सहा महिन्यापुर्वी नव्याने रस्त्याचे काम करण्यात आले होते परंतु ठेकेदाराने काम करीत असताना डाबंर कमी व खडीचा वापर जास्त केल्याने रस्त्यात माेठ माेठे खड्डे पडले असुन त्यामुळे लाेकांना खड्डे चुकवण्यासाठी माेठी कसरत करावी लागत आहे तसेच रस्त्यावर खाचखळगी व खडी उचकटुन आजुबाजुला पडत आहे त्यामुळे रस्त्यावरुण प्रवास करणार्या नागरिकाना व प्रवासाना त्रास सहन करुन आपघाताना सामाेरे जावे लागत आहे तेव्हा रस्त्याचे निक्रुष्ट काम करणार्या ठेकेदाराकडुन नव्याने रस्त्याचे काम करुन घेण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातुन हाेत आहे.शासन लाखाे रुपये खर्च करुन नागरिकाना, प्रवाशाना साेयीचा व सुलभ प्रवास व्हावा यासाठी प्रयत्नशील असते परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळे प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे