प्रशासनाच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव सण साजरा करुया - नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी .

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कोल्हापूर जिल्हा पोलिस इचलकरंजी शहर पोलिस दल आयोजित गणेशोत्सव २०२१ सणाच्या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक २/९/२०२१ रोजी  ना. बा. घोरपडे (सरकार ) नाट्यगृह येथे  चर्चात्मक बैठकीचे आयोजित करण्यात आले होते या बैठकीत नगराध्यक्षा  ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) आपले मनोगत व्यक्त करताना  कोरोना ,महापुराच्या संकटातून आत्ताच वस्त्रनगरी सावरली आहे.यावर्षीही शासनाने व नगरपरिषद ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत नियमांच्या चौकटीत शहरात गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन केले.*

*यावेळी  व्यासपिठावर  प्रांतधिकारी डाॕ विकास खरात, इचलकरंजी उपअधिक्षक मा श्री बी बी महामुनीसो, मुख्यधिकारी मा डाॕ प्रदिप ठेंगल, तसेच इचलकरंजी शहरातील गावभाग,शिवाजी नगर,शहापुर, पोलिस स्टेशन चे सर्व api,pi पोलिस अधिकारी व शहर वाहतुक api,पोलिस आधिकारी नगरपरिषद चे आरोग्य आधिकारी डाॕ सुनिल संगेवार,शहरातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदधिकारी,गणेश भक्त मान्यवर चर्चात्मक बैठकीत उपस्थित होते*

Post a Comment

Previous Post Next Post