प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनास इचलकरंजीकरांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल नगराध्यक्षा ॲड .सौ. अलका स्वामी शहरवासियांचे आभार मानले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी : पर्यावरण पूरक गणेशोत्सवा साजरा करण्यासह पंचगंगा नदी प्रदषणमुक्तीसाठी आणि शहापूर खणीतच श्री मूर्तीचे विर्सजन करण्यासाठी* *प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनास* *इचलकरंजीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. याद्वारे सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व  पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यास घेतलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्षाॲड .सौ. अलका स्वामी शहरवासियांचे आभार मानले.*

*रविवारी अनंत चतुर्दशी दिनी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी शहापूर खणीतच श्री मूर्ती विसर्जित करुन नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला.कोणताही अनुचित प्रकार न घडता विसर्जन शांततेत पार पडले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या प्रांगणात शुभारंम करण्यात आला. इचलकरंजी (वस्त्रनगरीचा ) मानाच्या बिरदेव मंडळाच्या व शिवाजी नगर पोलिस स्टेशन श्रींच्या पालखीचे पुजन नगराध्यक्षा ॲड . सौ. अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात,अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,आरोग्य सभापती संजय केंगार, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, अप्पर तहसिलदार शरद पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर दिवसभरात नगराध्यक्षा ॲड . सौ. अलका स्वामी यांच्यासह सर्वच पदाधिकारी, अधिकारी यांनी शहापूर खण येथे वेळोवेळी भेटी देऊन नियोजनाची पाहणी केली.*

*कोवीड 19 व पंचगंगा नदी प्रदुषणामुळे नदीत कोणीही श्री मूर्ती विसर्जित करु नये, असे आवाहन पोलीस व* *प्रशासनाच्या व  नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी केले होते. त्या आवाहनास शहर व परिसरातील नागरिकांसह सार्वजनिक मंडळांची चांगला प्रतिसाद दिला. प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत सर्वांनी श्री मूर्ती शहापूर खणीतच विसर्जित केल्या. आवाहनास प्रतिसाद दिल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी समस्त इचलकरंजीकरांचे आभार मानले असून असेच सहकार्य द्यावे, असे आवाहनही केले आहे.*

Post a Comment

Previous Post Next Post