प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय तर्फे घेण्यात येणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेमध्ये गुरुकुल स्कॉलर अकॅडमीच्या दिव्यांग संकेत उदय कुंभोज वय वर्षे 13 या विद्यार्थ्यांची निवड झाली कोल्हापूर जिल्ह्यांमधून साधारणपणे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
संपूर्ण भारत देशातून सर्वाधिक मेरीट मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड होणे प्रतिष्ठेचे समजले जाते सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षेचे तयारी करून घेण्याच्या उद्देशाने गुरुकुल ने गुरुकुल स्कॉलर अकॅडमी युनिट ची स्थापना करण्यात आली आहे. अनुभवी शिक्षक उत्कृष्ट अभ्यास नियोजन सततचा प्रश्नपत्रिका सराव व स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न वापरल्यामुळे संकेतला यश संपादन करता आले असे संकेत च्या पालकांनी गौरवोद्गार काढले .
संकेतला सदर यश संपादन करण्यासाठी गुरुकुल स्कॉलर अकॅडमी चे श्री दीपक वराळे सर, दादासाहेब कारदगे सर, रवींद्र खाल्ले सर,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे चेअरमन श्री गणेश नायकुडे व्हाईस चेअरमन नविता नायकुडे डेप्युटी डायरेक्टर सचिन पुजारी अकॅडमिक डायरेक्टर श्री वेंकट रंगा सर, मुख्याध्यापिका सौ. बालिका पाटील, सौ. रेवती मगदूम, तसेच संकेत चे मम्मी पप्पा यांची प्रेरणा मिळाली.संकेतच्या अभिनंदनिय निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.