जवाहर नवोदय निवड परीक्षेमध्ये अब्दुललाट येथील दिव्यांग विद्यार्थी संकेत उदय कुंभोज यांचे अभिनंदनिय निवडीची सावली दिव्यांग संस्थेने घेतली दखल..



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी- आप्पासाहेब भोसले                   

केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय तर्फे     घेण्यात येणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेमध्ये गुरुकुल स्कॉलर अकॅडमी चा अब्दुल लाट येथील दिव्यांग विद्यार्थी संकेत उदय कुंभोजे इयत्ता सहावी,याची संपूर्ण देशातून सर्वाधिक मेरीट मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल जवाहर नवोदय विद्यालय येथे अभिनंदनीय निवड झाली. याची दखल घेत सावली दिव्याग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार गेजगे यांनी अब्दुललाट येथील संकेत च्या घरी भेट देऊन संकेतचे अभिनंदन करुन पुष्पगुच्छ देऊन करून संकेतला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्याचे कौतुक करण्यात आले भविष्यात काही अडचणी आल्यास संकेतला सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post