ब्रेकींग न्युज : तारदाळ खोतवाडी चे राजकारण पाण्यात



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी— आप्पासाहेब भोसले

                 हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी चे सध्याचे राजकारण पाहता संपूर्ण पाण्याभोवतीने फिरताना दिसत आहे. गेली दोन वर्ष भारत निर्माण पाणीपुरवठा तारदाळ खोतवाडी येथील गैरव्यवहाराबाबत अनेक आंदोलने होत आहेत त्यामध्ये तारदाळ खोतवाडी चा संपूर्ण राजकारण यांमध्ये शिरल्याने आंदोलकांची भूमिका बाजूला राहून वैयक्तिक राजकारण यांमध्ये जोर धरत आहे.

भारत निर्माण पाणीपुरवठा आंदोलनामुळे 2019 व 20 चे सरकारी ऑडिट करण्यात आले सदर ऑडिटमध्ये 12 लाख तात्काळ भरण्यास सांगितले व 50 लाखाचा लेखी खुलासा मागितला होता. चार एप्रिल रोजी ऑडिट प्राप्त झाल्यावर तो बारा जुलैपर्यंत देणे भाग होते पण पाणीपुरवठा कमिटीकडून जाणीवपूर्वक वेळ लावत दीड महिना लेट दिला आहे तरीही गट विकास अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.


पाणीपुरवठ्याच्या 25 संचालकांपैकी 13 संचालकांचा यांच्या कारभाराला विरोध असूनही कोणतेही मीटिंग न घेता पाणीपुरवठ्यात खर्च  हा अध्यक्ष अशोक चौगुले व सचिव पवन शिंदे हे बेतालपणे  करत असून तसेच 26 जानेवारी 2020 च्या गाव सभेमध्ये दोषी वर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले असूनही दोन्ही ग्रामपंचायतीची भूमिका  संशयास्पद असल्याचे तारदाळ खोतवाडी ग्रामस्थांमधुन बोलले जात आहे.



 यामध्ये प्रामुख्याने गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित होते, पण गावातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये कारवाई होऊ नये यासाठी आपले वजन खर्ची करताना दिसत आहेत, सध्या तारदाळ गावामध्ये प्रसाद खोबरे गटाचे आठ ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे सहा सदस्य हे भारत निर्माण पाणीपुरवठा अध्यक्ष व सचिव यांच्या गैर व्यवहाराच्या बाजूने दिसत आहे जनतेसाठी निवडून आलेले हे ग्रामपंचायत सदस्य व तारदाळ मधील लोकप्रतिनिधी गैर व्यवहाराच्या पाठीशी राहताना दिसून येत आहे, यामुळे तारदाळ खोतवाडी मध्ये जनतेच्या जीवावर निवडून आलेले या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत जनतेच्या बाजूने न राहिल्याने लोकांच्यामध्ये नाराजी दिसत आहे जर एका वर्षात 62 लाखाचा गोंधळ दिसत असेल तर  सन 2020/21 चे ऑडिट होणे गरजेचे आहे 

राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा अध्यक्ष व सचिव यांच्या मागे दोन्ही गावातील लोक प्रतिनिधी शासकीय अधिकारी ही यामध्ये सामील असल्याचे जनतेतून बोलले जात आहे त्यामुळे त्यांना पाठबळ मिळत आहे त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी आहे.

                तारदाळ चे सरपंच यशवंत वाणी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की विद्यमान अध्यक्ष व सचिव यांचा दोन्ही ग्रामपंचायतीना विश्वासात न घेता बेकायदेशीर बेताल पणे कारभार चालू आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.पण कारवाई कधी असा प्रश्न तारदाळ खोतवाडी नागरीकांमधून केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post