पुढच्या वर्षी महाराष्ट्रात 100 ठिकाणी शिवोत्सव साजरा करु :-मा. सतीश काळे (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड).
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ : देहूरोड दि १०सप्तेंबर ऐतिहासिक धम्मभूमी देहुरोड येथे शिवोत्सवा चे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमा चे अध्यक्ष भीमपुत्र टेक्सास गायकवाड़ होते तर कार्यक्रमा चे उदघाटन मा. सतीश काळे (उपाध्यक्ष पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड)यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. सुरेश दादा गायकवाड़ (ओबीसी नेते )आणि मा. राहुल मदने (कोषाध्यक्ष बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर)उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. सतीश काळे यांनी सांगितले की टेक्सास दादानी सुरु केलेल शिवोत्सव हा एक अभिनव उपक्रम आहे. पुढच्या वर्षी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कमीतकमी 100 ठिकाणी साजरा करणार असा निर्धार व्यक्त केला.ओबीसी नेते सुरेश दादा गायकवाड़ यावेळी बोलताना म्हणाले की सर्वप्रथम महात्मा फुले नी शिवजयंती ही शिवोत्सव म्हणून साजरी केली,,,
भीमपुत्र टेक्सास गायकवाड़ यांनी या वेळी सांगितले की महत्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची रायगड़ावरील समाधी शोधून काढली व स्वच्छ करुन फुले वाहिली,महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी शिवोत्सव साजरा करावा अस आवाहन ह्यावेळी भीमपुत्र टेक्सास गायकवाड़ यांनी केला.
या वेळी मा. हमीदभाई कुरेशी मा. डी.पी.भोसले, मा. मंदाकिनी ताई भोसले, मा. रंजनाताई सोनवणे, मा. मीनाताई गायकवाड, मा. अशोकराव सोनवणे, मा. दीपक भाऊ भालेराव, मा. प्रवीण साखरे, मा. यशवंतराव गायकवाड, मा. तनवीर मुजावर, प्रा. अजित जगताप, मा.चंद्रशेखर पात्रे., मा. बाबासाहेब गायकवाड, मा. डी. ए. धांडोरे, मा. गौतम गंगावणे, मा. नवीन वानखेडे, मा. सुरेश भाऊ गायकवाड, मा. विद्या ( मावशी ) गायकवाड, मा. मधुकर गायकवाड, मा. राहुल शिंदे, मा. विकास सूर्यवंशी, मा. विजय गायकवाड, मा. हनुमंतराव राऊत, मा. विजयराव ढावरे, मा. भारत भगत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.अशोकराव गायकवाड यांनी केले.प्रास्ताविक मा. धर्मपाल तंतरपाळे, आभार मा. अरुण भाऊ जगताप यांनी मानले. इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.