प्रेस मीडिया वृत्तसेवा : पृथ्वीराजसिंग राजपुत :
दत्तवाड- आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विकास निधीतून दतवाड येथे उभारण्यात आलेल्या हाय मॅक्स दिव्यांची उद्घाटन युवा नेते आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले .
त्यावेळी त्यांनी दतवाड च्या विकासासाठी यड्रावकर कुटुंबीय सदैव तत्पर आहेत दत्त वाडकर यांच्या पाठीशी ते कायम राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली राज्यमंत्री यड्रावकर ,माजी सभापती मिनाज जमादार जि प सदस्य स्वर्गीय प्रवीण माने खासदार दर्शील माने यांच्या विकास निधीतून गावातील विविध चौकात हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत याचे उद्घाटन आज आदित्य पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच नाना नेजे, डी एन सिदनाळे,नुर काले प्रकाश चौगुले, दौलत माने, बाबूराव पोवार, प्रमोद पाटील, संजय पाटील, राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.
फोटो-- हायमॅक्स दिवे चे उद्घाटन करताना आदित्य पाटील-यड्रावकर सोबत सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच नाना नेजे,नूर काले ( फोटो- लाला मांजरेकर)