प्रेस मीडिया वृत्तसेवा : पृथ्वीराजसिंग राजपूत :
हेरवाड:- तालुका शिरोळ येथे हेरवाड पाचवामैल मार्गालगत राजू आलासे यांच्या शेतातील विहिरीवर बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता काही शेतकऱ्यांना गवा रेड्याचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेरवाड पाचवामैल मार्गा मार्गा जवळ बरोबर आहे जवळ राजू आलासे यांची शेती आहे या शेतामध्ये असणाऱ्या विहिरीवर बुधुवारी सायंकाळी6:30 वाजता गवा रेड्याचे दर्शन काही शेतकऱ्यांना झाले.हेरवाड मध्ये अचानक गवा रेडा आल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली गवा रेडा कोठून आला याबाबत ची चर्चा मात्र गावात सुरू होती दरम्यान याबाबत माजी सभापती व पंचायत समिती सदस्य मिनाज जमादार यांनी वन विभाग व तहसील कार्यालयाला याबाबत ची माहिती कळवली असून वनविभागाचे पथक लवकरच हेरवाड मध्ये दाखल होणार आहे,तोपर्यंत या परिसरातील शेतकर्यांनी या परिसरात जाताना सावधानता बाळगावी असे आव्हान पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार यांनी केले आहे .