प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पत्रकार मित्र हो आपल्याला माहीत आहे की 19 सप्टेंबर 2021 रोजी बोलावलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही महापुराच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 2 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली होतो. त्या संबंधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी आमच्या शिष्टमंडळाची भेट विधानपरिषद सदस्य आदरणीय महंतेश कवटगिमट यांनी बेळगांव येथे घडवून आणली. या भेटी प्रसंगी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित समस्या समजून घेऊन महापुरप्रश्नी एक अभ्यासगट नेमून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमची मते जाणून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणारे लाक्षणिक उपोषण आम्ही तात्पुरते स्थगित करीत आहोत व आगामी काळात मुख्यममत्र्यांच्या भेटी नंतर पुढील दिशा ठरविली जाईल. या प्रश्नाची समाधानकारक सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा आम्ही करणार आहोत. या पाच सदस्यीय शिष्टमंडळामध्ये श्री सुरेश देसाई व श्री प्रमोदकुमार पाटील, बेडकिहाळ, अभय होनावडे-कारदगा, बाळगोंड पाटील शिरदवाड, पृथ्वीराज पाटील भोज यांचा समावेश होता या पत्रकार परिषद अध्यक्ष डॉ एन दाबाडे हे होते