प्रेस मीडिया वृत्तसेवा :
बेडकिहाळ येथे तक्षशिला भवण मध्ये सावित्रीबाई फुले महिला संघटना कडुन विक्रम शिंगाडे यांना इंडियन इंपायर डवलपमेंट चेन्नई युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल संघाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डी.एन दाभाडे हे लाभले होते. त्या कार्यक्रमाला बेडकिहाळ ग्राम पंचायत अध्यक्षा सौ.मेघा मोहीते, उपाध्यक्ष सौ.स्वाती कांबळे, ग्राम पंचायत सदस्य देसाई मॅडम, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तालुका पं सदस्य चॉंद मुल्ला, महिला संघाचे अध्यक्ष जीवन यादव, महिला संघाच्या अध्यक्षा दिपा जाधव, तसेच संघाच्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.
मनोगतामध्ये प्रमोद पाटील यांनी विक्रम शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याची कौतुक केले.तसेच अध्यक्षनीय भाषणामध्ये दाभाडे यांनी समाजासाठी आता एकजुटीने व चळवळीचे आता अत्यंत गरज आहे. युवा पिढीने आता सामाजिक कार्याकडे लक्ष द्यावे. विक्रम शिंगाडे यांचे कार्य प्रेरणा घेन्यासारखे आहे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वाजंत्री सर यांनी केले.