प्रेस मीडिया वृत्तसेवा : डॉ. विक्रम शिंगाडे :
आज बेडकीहाळ येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला संघाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांच्या अमृत हस्ते विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी माजी आमदार सुभाष जोशी, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर ,निपाणी ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष राजेश कदम,दत्त कुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, शंकर दादा पाटील,तिसरी आघाडी प्रमुख राजू खिचडे, डॉ. विक्रम शिंगाडे, अडवोकेट ब्रिजेश शास्त्री, संघाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते जीवन यादव, यांच्यासह बेडकीहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सर्व संचालिका ,पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते ,विविध मंडळाचे पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.