प्रेस मीडिया वृत्तसेवा : बेडकिहाळ :
बेडकिहाळ, ता, ३, येथील होतकरू युवा कार्यकर्ते बसवंत शिंगाडे चॅरिटेबलचे संस्थापक विक्रम शिंगाडे यांनी गेल्या दोन दशका पासून सर्व सामान्य नागरिकांच्या हिता साठी मदत कार्य, आपत्ती जन्य स्थित मदत वितरण, कोराना व महापूर काळात मास्क वितरण, सामूहिक विवाह, ओषधोपचार या सह विविध क्षेत्रात सतत पणे करत असलेल्या कामांची दखल घेऊन त्यांना" इंडीयन इंपायर डवलपमेंट" (चेन्नई युनिव्हर्सिटी तमिळनाडू ) यांच्या वतीने कुलगुरू डॉ सि पौल , ईबनेजर व्हाईस चेअरमन डॉ.प्रभाकर,अभिनेते सुमन तळवार माजी आमदार डॉ के ए मनोहरम यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तर शिंगाडे यांना मिळालेल्या या पदवी बद्दल बेडकिहाळ येथील शिंगाडे गौरव समितीच्या वतीने डॉ विक्रम शिंगाडे यांचा शुक्रवार (ता ३ )रोजी कुसुमावती मर्जी कला वाणिज्य महाविद्या लयाच्या सभागृहात नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, श्रीकांत तळवार (गोकाक) डि जी देशमुख,(सांगली) सुधाकर माने, बेळगांव जिल्हा तिसरी आघाडीचे अध्यक्ष राजू पाटील, उपस्तीत होते. स्वागत व प्रास्थाविक विक्रम शिंगाडे यांनी केले.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी गौरव समितीच्या वतीने माजी आमदार काकासाहेब पाटील, लक्ष्मण चिंगळे, व मान्यवर व गौरव समितीच्या सदस्यांनच्या वतीने विक्रम शिंगाडे यांचा शाल श्रीफळ, व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तर याच बरोबर विविध संघ संस्थेनंच्या वतीने ही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुधाकर माने, श्रीकांत तळवार,विद्याधर कांबळे, प्रमोद पाटील, यांनी विक्रम शिंगाडे यांनि आजवर केलेल्या सामाजिक व इतर कामनं समनंधी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी लक्ष्मण चिंगळे म्हणाले गेल्या १५ ते २० वर्षा पासून बेडकिहाळ येथील एक सर्वसामान्य युवक विक्रम शिंगाडे हे विविध क्षेत्रात सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्या साठी सतत प्रयत्न शील आहेत. तर त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना चन्नई येथील युनिव्हर्सिटी ने मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला, कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब पाटील म्हणाले बेडकिहाळ चे युवक विक्रम शिंगाडे यांचे कार्य खरोखरच समाजातील युवकांना प्रेरनादायी असून युवकांनी समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यां जाणून कार्य केले पाहिजे. तरच त्या कार्याचा गौरव होतो. आपले चांगले कार्य म्हणजे आपली ठेव असते.
या कार्यक्रमा प्रसंगी डॉ अनिल सलगरे, निवृत्ती गवळी, डि सि देशमुख, सुरेश देसाई, अभाजीत नादंने, संजय पाटील, सचिन पाटिल, गंगाधर सुर्यवंशी, मनोज जाधव, जीवन यादव, शिवाजी पाटील, शंकर पाटील, दादा सनदी, आरमान मुल्ला, सुरेश गोणे, ए ए जे जुनेदी पटेल, नानासाहेब पाटील, हसन मुल्ला, महमद मुल्ला, शिवानंद बीजले, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहाय्यक, ग्राम पंचायत सदस्या, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या तसेच सत्कार समितीचे सदस्य उपस्तीत होते. सूत्रसंचालन प्रीती हट्टीमनी यांनी केले. तर अजित कांबळे यांनी आभार मानले.