प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अकिवाट : अकिवाट येथील ताजुद्दीन तहसीलदार संचालक पार्वती सहकारी औद्योगिक वसाहत यड्राव यांना आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती बेळगाव कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा यांच्या वतीने सामाजिक सेवा गौरव पुरस्कार रत्नमाला सावनूर माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार व सुरज दादा पाटील उद्योगपती व चेअरमन हायटेक कोल्हापूर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
तहसीलदार गुरुजी शैक्षणिक सेवेत असताना व सेवा निवृत्ती नंतर ही समाजसेवा करीत आहेत याची दखल घेऊन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी एडवोकेट अरुण कल्लुंवर यड्राव सूतगिरणीचे संचालक आप्पासो बडबडे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासो दानोळे , इक्बाल बैरगदार , गणपती कागे, बाबासो तहसीलदार, अभियंता शहाजान शहाजान तहसीलदार व सर्व परिवार उपस्थित होते