यड्राव येथे १ कोटी ४५ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
यड्राव-
मागील पंचवीस वर्षापासून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर शहरांमध्ये आम्ही काम करतो, जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, तो करीत असताना मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होणाऱ्या नागरी सुविधा जयसिंगपूर शहरामध्ये आमच्याकडून निर्माण झाल्या आहेत, शहर असो वा गाव लोकांना नागरी सेवा सुविधा हव्या असतात, जयसिंगपूर मध्ये आम्हाला या कामी यश आले आहे, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये यड्राव गावचे सुपुत्र म्हणून नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व आणि शिरोळ तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरीही जयसिंगपूर शहरा प्रमाणे यड्रावसह शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून आपण काम करू असे प्रतिपादन जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले,.
यड्राव येथे नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वतीने दिलेल्या ८७ लाख, पंधराव्या वित्त आयोगातील ४४ लाख तसेच ग्रामपंचायतीच्या फंडामधील १४ लाख अशा एकूण १ कोटी ४५ लाखांच्या विविध विकास कामांचे उदघाटन शुक्रवारी संजय पाटील यड्रावकर व शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी ते बोलत होते, य ग्रामपंचायतीने नव्याने बांधलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहाचा उदघाटन सोहळा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला,
सत्तेत असताना आणि नसतानाही आम्ही यड्राव गावाशी असलेले आपले भावनिक नाते कधीही सोडले नाही आपल्या या गावासाठी अनेक वेळा स्वतः निधी उभा करून आम्ही कामे केली आहेत, आमच्यावर प्रेम करणारी तालुक्यातील जनता आमच्याकडे पाहताना आम्ही यड्रावकर म्हणते अशावेळी ऊर भरून येतो असेही संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, या पुढच्या काळात देखील गावातील अनेक प्रश्न आपणास मार्गी लावायचे आहेत, वर्षभराच्या आत या गावासाठीची पाणी पुरवठा योजना सक्षम करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जाईल, गावच्या मागणीप्रमाणे काही महिन्यातच गावाला रुग्णवाहिका व शववाहिका दिली जाईल असेही संजय पाटील यड्रावकर यांनी या वेळेला आश्वासित केले,
यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी ची जागा राज्य शासनाच्या माध्यमातून विना मोबदला मिळवून दिल्याबद्दल यड्राव ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव केला असल्याचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले यड्रावकर यांनी केलेल्या कामाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने संजय पाटील यड्रावकर यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी उपसरपंच सौ प्राची हिंगे, यड्राव बँकेचे संचालक जिवंधर मुरचीट्टे, युवा नेते आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर, पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर उर्फ बंडू पाटील, माजी सरपंच लक्ष्मीकांत लड्डा, सरदार सुतार, इचलकरंजीचे नगरसेवक राजवर्धन नाईक, शिवाजी दळवी, प्रदीप कोळी, ग्रामपंचायत सदस्य बाबासो राजमाने, महेश कुंभार, वंदना कदम, सौ अनिता माने, दत्तात्रय साळुंखे, ग्रामसेवक व्ही. व्ही. गावडे, शिवाजी पाटील, मोहन प्रभावळकर, चंद्रकांत पडियार, विजयानंद माने, सुभाष अकीवाटे, दादासो दानोळे, आर. टी. पाटील, अनिल दानोळे, सचिन मगदूम, राहुल दावाडे, शिवाजी जाधव, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.