प्लास्टो कंपनीची बनावट टाकी बनवणारी प्लास्टो लाईन कंपनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीसांच्या उपस्थितीत शील केली , प्लास्टो कंपनीची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

वारणानगर : कुशिरे ता. पन्हाळा येथील औद्योगिक वसाहतीत प्लास्टो कंपनीची बनावट टाकी बनवणारी प्लास्टो लाईन कंपनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपनीच्या कायदेशीर सल्लागार व नेमलेल्या स्थानिक कोर्ट कमिशनने कोडोली पोलीसांच्या उपस्थितीत शील केली प्लास्टो कंपनीची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे.

आरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कायदेशीर सल्लागार आशिष विश्वकर्मा,नवकार असोसिएट्सचे वकील आणि आयपीआर सल्लागार विजय सोनी, नम्रता जैन यांनी गुरुवारी कुशीरेतील बनावट टाकी तयार करणाऱ्या प्लास्टो लाईन कंपनीवर मोठी कारवाई केली. प्लास्टोलाईनच्या नावाने कंपनीमध्ये टाक्या विकल्या जात आहेत ज्यावर लिहिलेले आहे की प्लॅस्टो प्लास्टिकच्या टाक्या आरसी प्लास्टो टँक्स अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि नोंदणीकृत कॉपीराइट शैलीचा वापर करून प्लास्टोलाइनच्या नावाने बाजारात विकल्या जात आहेत अशा तक्रारी कंपनीला कोल्हापूरच्या एका कंपनीकडून सातत्याने तक्रारी येत होत्या याची दखल घेवून ही कारवाई केली.

नवकार असोसिएट्सचे वकील आशिष विश्वकर्मा, विजय सोनी, नम्रता जैन यानी आरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ वतीने दिल्ली न्यायालयात दावा दाखल केला यामध्ये न्यायालयाने स्थानिक कोर्ट कमिशन नेमून कारवाईचे आदेश दिल्यावर या नेमलेल्या कमिशनने आज गुरुवार दि. १९ रोजी कुशिरे येथे प्रत्यक्ष प्लास्टो लाईल कंपनीत येवून तयार केलेली टाकी तसेच बनावट ट्रेडमार्क व इतर साहित्य जप्त करून यंत्रसामुग्रीसह संपूर्ण कंपनीला सील केले.स्थानिक कोर्ट कमिशनच्या कार्यवाहीमध्ये आरसी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड चे नोंदणीकृत ट्रेडमार्क होते आणि नोंदणीकृत कॉपीराइट वापरणे. टाकी प्लास्टोलाइन नावाने विकली जात आहे, ज्यामध्ये स्थानिक कमिशनने शोध घेवून जप्त करून कंपनी सील केली

 यामध्ये यंत्रसामग्री तसेच पाच लाख रू. मुद्देमालाचा समावेश आहे यावेळी कोडोली पोलीस ठाणयाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.कोल्हापूर येथील पोतदार हे कुशिरे येथे प्लास्टो लाईन कंपनी चालवत होते त्यांनी दिल्ली न्यायालयाने नेमलेल्या स्थानिक कमिशनला सत्कार्य करीत न्यायालयात उपस्थित रहाण्याची नोटीस स्विकारली आहे या कारवाईमुळे कंपनीकडे काम करणाऱ्या सुमारे वीस एक कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.कुशिरे औद्योगिक परिसरातही या कारवाईने खळबळ उडाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post