साऊथ सुपरस्टार यशच्या 'केजीएफ-2' पुढच्या वर्षी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 साऊथ सुपरस्टार यशच्या 'केजीएफ-2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी जुलैमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे थिएटर बंद असल्याने 'केजीएफ-2' चे प्रदर्शन रखडले होते.रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या नवीन तारखेची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट आता थेट पुढच्या वर्षी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता संजय दत्तने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. 'केजीएफ-2' मध्ये संजय दत्त हा अधीरा नावाच्या खलनायकाची भूमिका साकारत आहे. रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश आणि अच्युत कुमार यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post