खून करून जिल्ह्यातून पलायन करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या आरोपीस शिरवळ पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ बसस्थानक परिसरातून जेरबंद केले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

शिरवळ, ता. खंडाळा येथे सुलभ शौचालयात एकाचा खून करून जिल्ह्यातून पलायन करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या आरोपीस शिरवळ पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ बसस्थानक परिसरातून जेरबंद केले.विनोद भिमराव वावळे वय 24 रा. शिरवळ मुळ रा. न्हावा, ता. पालम, जि. परभणी असे संशयिताचे नाव आहे. दारुच्या नशेत किरकोळ वादातून ही हत्या केल्याची कबुली संशयिताने पोलिसांजवळ दिली आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की ,  शिरवळ बसस्थानकाच्या सार्वजनिक शौचालयात रणजित गणपतराव जाधव रा. शिरवळ यांचा खुन झाला होता. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरवळ परिसरात रवाना झाले. दरम्यान, खुनप्रकरणातील संशयित शिरवळ एस.टी.स्टॅन्डच्या पाठिमागे फिरत असून तो सातारा जिल्ह्यातून पलायन करण्याच्या बेतात आहे, अशी माहिती पोलीस पथकास खबर्‍याकडून कळाली. त्यानंतर पथकाने शिरवळ बसस्थानक परिसरात सापळा रचला. थोडयाच वेळात माहितीतील वर्णना प्रमाणे असलेला संशयीत शिरवळ एस.टी.स्टॅन्डच्या दिशेने येताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ संशयीतास ताब्यात घेणेसाठी हालचाल केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे खुनाच्या अनूषंगाने चौकशी केली असता त्याने पोलीस पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस पथकाने त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता संशयीत इसमाने दारुच्या नशेत किरकोळ वादाच्या कारणावरून राग आल्याने त्याचा खुन केल्याची कबूली दिली. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाने व शिरवळ पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या तपास करुन 11 तासाचे आत उघड केला आहे. आरोपीस पुढील कारवाई करीता शिरवळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे उप विभागीय पोलीस अधिकारी (फलटण) तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी (वाई) श्रीमती शिवल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शना खाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, एलसीबीचे सपोनि आनंदसिंग साबळे, शिरवळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर अरगडे, सफौ उत्तग दबडे, तानाजी माने, हवालदार संतोष सपकाळ, मोहन नाचण, राजकूमार ननावरे, अजित कर्णे, निलेश काटकर, नितिन गोगावले, वैभव सावंत, विजय सावंतव सफौ हजारे, वळवी, रामा कोलवडकर, जितू शिंदे, धिरज यादव, वैभव सुर्यवंशी, सचिन शेलार, संतोष ननावरे, भाऊसाहेब दिघे, नितीन महांगरे, सचिन वीर, प्रशांत वाघमारे, विनोद पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Post a Comment

Previous Post Next Post