प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ प्रतिनिधी : शिरोळ तालुका पूरग्रस्त पुनर्निर्माण समितीच्या वतीने मुख्य निमंत्रक डॉक्टर एस के माने व सहनिमंत्रक संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषणास बसले आहेत
महा पूरग्रस्तांचे रहिवास आहे त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचा स्टील फेब्रिकेशन च्या साहित्याने दोन मजली घरे दुकाने रस्ते व उड्डाणपुलाची निर्मिती करून तालुका पूरग्रस्तांचे पुनर्निर्माण करावे या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालय शिरोळ यांच्यासमोर लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली
सन 2005 2007 2019 व 2021 मध्ये आलेल्या विध्वंसक महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचे जनजीवन उध्वस्त झाले आहे सततच्या येणाऱ्या महापुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत त्यांचे आहेत त्या ठिकाणावर स्टील फेब्रिकेशन च्या साह्याने दुमजली घरे दुकाने रस्ते व उड्डाणपुलाची निर्मिती करून पूरग्रस्तांचे पुनर्निर्माण करणे गरजेचे बनले आहे पूरग्रस्त रहिवाशांची घरे दुकाने स्तील फॅब्रिकेशने दुमजली करून उड्डाणपुलाची जोडावे 42 पूरग्रस्त गावांमध्ये स्टील फेब्रिकेशन च्या उड्डाणपुलाची निर्मिती करून ती बुडीत क्षेत्राच्या पलीकडच्या भागांना कमाने द्वारे संलग्नित करण्यात याव्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 60 हजार रुपये नुसकान भरपाई देऊन पीक कर्ज माफ करावे पूरग्रस्त शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना 15000 सानुग्रह अनुदान देण्यात येऊन त्यांना रेशन कार्डावर 30 किलो गहू व 30 किलो तांदूळ यांचे मोफत वाटप तात्काळ करावे महापुरात पडलेल्या घरांना नुसकान भरपाई म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तात्काळ देण्यात यावेत शेती पिकाचे महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तालुक्यात पर्यायी बीटरूट ची लागण व मत्स्य शेती या करिता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना विशेष सवलती देऊन प्रोत्साहीत करण्यात यावे सण 2019 च्या महापुराची पुरेशा गृहीत धरून नुसकान भरपाई व सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी माफ करण्यात यावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे