शिरोळमध्ये बैल व घोडा गाडी शेतकऱ्यांचा मोर्चा* *मंत्री खासदार आमदार यांच्या घरावर मोर्चे काढणार*




पृथ्वीराजसिंग राजपूत : 

शिरोळ:- शेतीसाठी उपयुक्त असणार्या बैलाला जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळावे बेटा कायदा रद्द करावा छत्रपती राजाराम महाराज व शाहू महाराज यांनी सुरू केलेली बैल व घोडागाडी शर्यतीची परंपरा कायम सुरू ठेवावी या मागणीसाठी बुधवारी शिरोळ तालुक्यातील बैल व घोडा गाडी शैर्यतीशौकिन शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र राजर्षी शाह बैलगाडी रेसिंग असोसिएशन मार्फत मोर्चा काढण्यात आला .

    येथील बुवाफन मंदिराच्या पटांगणात झालेल्या मोर्चा धारकांच्या सभेत बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी येत्या चार दिवसात व्यापक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल , त्यानंतर खासदार , आमदार आणि मंत्री यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील असा इशारा देण्यातआला . 

  दरम्यान बैल व घोडा गाडी शर्यतीचे आंदोलन , मोर्चा निघताच कामा नये असा आदेश जिल्हा पातळीवरून काढण्यात आल्याने पोलिसांनी नृसिंहवाडी शिरटी घालवाड , अर्जुनवाड , धरणगुत्ती जयसिंगपूर , नांदणी नाका अशा प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून बैल व घोडा गाडी मोर्चा धारकांना तब्बल दोन तास थांबवून ठेवले होते . त्यामुळे आक्रमक झालेल्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढण्याची ठाम भूमिका पोलिसांसमोर विशद केली . आंदोलनाला कोणत्याही प्रकारची गालबोट लागणार नाहीपोलिस प्रशासनाला सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली . मात्र पोलिसांनी शर्यती शौकिनांच्या घोडा व बैलगाड्या तहसील कार्यालयापर्यंत जाऊन दिल्या नाहीत . मोर्चाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी केले . मागणीचे निवेदन नायब तहसीलदार पी.जी. पाटील यांनी स्वीकारून आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.मोर्चात २०० हुन अधिक बैल व घोडागाडी सहभागी झाल्या होत्या .

Post a Comment

Previous Post Next Post