आमदार नाईक यांच्या हस्ते शेतकरी सल्लागार समितीच्या सर्व 22 सभासदांना निवडीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : विजय हूपरीकर: 

 शिराळा : आज येथे तालुका कृषि कार्यालयामार्फत कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेतंर्गत शेतकरी सल्ला समितीची सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मानसिंगराव नाईक होते. यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते शेतकरी सल्लागार समितीच्या सर्व 22 सभासदांना निवडीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या बैठकीस तहसीलदार गणेश शिंदे, तालुक्याच्या सभापती वैशालीताई माने, पंचायत समिती सदस्य मनिषा गुरव, सहाय्यक गट विकास अधिकारी अरविंद माने, तालुका कृषी अधिकरी जी. एस. पाटील, तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष राजेंद्र दशवंत, सदस्य सर्वश्री. गजानन पाटील (कांदे), वैशाली माने (सागाव), मनीषा गुरव (कणदूर), संचित देसाई (गिरजवडे), रेश्मा बेंगडे (मेणी), सुवर्णा भालेकर (निगडी), जयश्री खिलारे (शिराळे खुर्द), मनीषा नायकवडी (चरण), रुपाली नलवडे (शिराळा),  भगवान पाटील (अंत्री बुद्रुक), निलेश काटके (कुसाईवाडी), मंदाकिनी पाटील (कापरी), वंदना खोत (अस्वलेवाडी), बाबासो पाटील (पाडळेवाडी), अरविंद माळी (खेड), सदाशिव नावडे (किनारेवाडी), मधुकर पाटील (रिळे), श्रीकृष्ण सावंत (मोरेवाडी), कृष्णा माने (मानेवाडी),   सचिव, प्रचिती सहकारी खरेदी-विक्री संघ (शिराळा) व सचिव, सहयाद्री सहकारी खरेदी-विक्री संघ (शिराळा), तसेच मंडळ कृषि अधिकारी (कोकरूड), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post