प्रेस मीडिया वृत्तसेवा :. विजय हूपरीकर :
सांगली महानगरपालिकेने उभारले कार्पोरेट दर्जाचे वाचनालय आणि अभ्यासिका: सांगलीच्या वि.स. खांडेकर वाचनालयाच्या अद्ययावत अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहचतील : मनपा आयुक्त नितीन कापडणीस याना विश्वास.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कार्पोरेट दर्जाचे वाचनालय आणि अभ्यासिका सुरू केली आहे. सांगलीच्या वि.स. खांडेकर वाचनालयाच्या अद्ययावत अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहचतील असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला आहे. एखाद्या खासगी इन्स्टिट्यूटप्रमाणे महापालिकेने पाहिली कॉर्पोरेट अभ्यासिका बनवल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका वि.स.खांडेकर वाचनालयाची अद्यावत इमारची स्थापना १६ एप्रिल १९७५ साली झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील सर्वात जुने वाचनालय असून शहराचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख आहे. या वाचनालयास शासनाकडून अ वर्ग दर्जाचे उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून सन १९९० मध्ये मानाचा प्रथम क्रमांकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. तसचे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थीना स्पर्धा परीक्षेची तयारी करीता सन १९८४ पासून अभ्यासिकेची सोय उपलब्ध करुन दिली आहे व त्याचा लाभ घेऊन येथील विद्यार्थी राज्य शासनाच्य उच्च पदावर काम करीत आहेत. या अभ्यासिकेची सुरवात १५ टेबल व १ रुपया महीना फी पासून सुरु झाली होती. आज त्याच अभ्यासिकेचे अदयावत नुतनिकरण होत असून त्यामधून शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थीना यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारीसाठी ही अदयावत अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासिकेत वायफाय कनेक्शन, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, एलसीडी स्क्रिन, पाण्याची , स्वछता गृहाची सोय करण्यात आली आहे. तसेच सर्वप्रकारची वाचनीय पुस्तके सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचबरोबर खासगी कार्पोरेट अभ्यासिकेप्रमाणे महापालिकेकडून वि.स. खांडेकर वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून या माध्यमातून अनेक विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करून मोठ्या पदावर पोहचतील. सध्या कोविड परिस्थितीमुळे अभ्यासिका सुरू केलेली नाही मात्र लवकरच कोव्हीड नियमांचे पालन करून अभ्यासिकेला परवानगी दिली जाईल असेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.