विजय हुपरीकर :
ठाकरे सरकार कडून व महाविकास आघाडीकडून सत्तेचा गैर वापर करून सांगली मधील भाजप कार्यकर्त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. चुकीचे पद्धतीने गुन्हे दाखल करणे चालु आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ व कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर लावलेल्या नवनिर्वाचित मंत्रांच्या शुभेच्छा च्या होल्डिंग वर नारायण राणेच्यां फोटोवर काही भ्याड शिवसैनिकांनी कार्यालय बंद असताना शाई फेकली.
या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ व याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांच्या कडून शिवसेनेच्या कार्यालयावर व शाही फेकलेल्या शिवसेनेच्या भ्याड कार्यकर्त्यांच्या वर हल्ला व आंदोलन होऊ नये व याला तीव्र प्रतिउत्तर देऊ नये म्हणून या भित्र्या ठाकरे सरकार कडुन सत्तेचा गैरवापर करून मला आज नोटीस देण्यात आली. याला मुख्यमंत्री यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची किनार आहे. पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. यांच्या विषयी तक्रार नाही पण या ठाकरे सरकार च्या व या स्थानिक सत्ताधारी नेत्यांच्या मंत्र्यांच्या मनात माझ्या सारख्या भाजप कार्यकत्या विषयी असलेली भिती दिसली . असुदे ! ये डर अच्छा है ! योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल