प्रेस मीडिया वृत्तसेवा : सांगली : विजय हुपरीकर :
सांगली : "स्वच्छता संकल्प देश का" मोहीमे अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असणारे आणि रस्त्यावरील सिंगल युज प्लास्टिकचे संकलन रविवारी केले. यामध्ये 1 टन प्लास्टिक गोळा करण्यात आले असून या प्लास्टिक पासून पेव्हीन ब्लॉक तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रबोधनातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक गोळा झाले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट २०२१ महिन्यामध्ये रविवार दि.२२/०८/२०२१ रोजी 'सिंगल युज प्लास्टिक बंदी' साठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बाजार परीसर व व्यापारी क्षेत्रातील प्लास्टीक व्यावसायिक व नागरीक यांना प्रबोधन केले .
यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि त्यांच्या टीमकडून जमा केलेले सिंगल युज प्लास्टिक महापालिका ट्रेडींग मशिनवर श्रेडींग करून पेव्हींग ब्लॉक बनवणेसाठी पाठवले आहे. या सिंगल युज प्लॅस्टिकपासून पेव्हीन ब्लॉक तयार केले जाणार आहेत.