प्रेस मीडिया वृत्तसेवा : सांगली : विजय हुपरीकर :
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका शाळांचा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात मनपा शाळांचा पट 121 ने वाढल्याची आणि आतापर्यंत महानगरपालिकेच्या 23 शाळेमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरु झाल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री नितीन कापडणीस यांनी दिली. मागील 3 वर्षात सातत्याने पट वाढ होत आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या 50 शाळा (मराठी 38, उर्दु 10, कन्नड 2) आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. शिक्षण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजीटल क्लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करणेत येत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा शाळांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
याचा परिणाम शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण पट 5390 इतका होता. मनपा शाळांनी वर्षभर विविध उपक्रमातून शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. नव्या शैक्षणिक वर्षात मनपा शाळांचा पट 121 विद्यार्थ्यांनी वाढ होवून एकूण पट 5511 इतका झाला आहे. तसेच सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मागील वर्षी 272 व यावर्षी 147 विद्यार्थी एवढी लक्षणीय वाढ झाली आहे असेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
महापालिका शाळेत पुढील उपक्रम राबविले जात आहेत
1. कोव्हीड कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली.
2. ऑफलाईन शिक्षणामधील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक गृहभेटीच्या माध्यमातून तयारी करुन घेतली.
3. ई लर्निंग चे माध्यमातून शिक्षण
4. शाळेमध्ये भोतिक सुविधा उपलब्ध करुन शाळा अद्ययावत करुन दिल्या
5. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची परिक्षेची ऑनलाईन तयारी करुन बोर्ड परिक्षेच्या धर्तीवर तीन सराव चाचण्या
घेण्यात आल्या आहेत.
* सेमी इंग्लिश वर्ग – शहरी भागात इंग्लिश माध्यमातून शिक्षणाचा पालकांचा कल आहे. याची दखल
घेवून महानगरपालिकेच्या सेमीच्या 18 शाळांमध्ये 5 ने वाढ होवून सन 2021-22 मध्ये एकूण 23 शाळांमध्ये सेमी
इंग्लिश माध्यमाचे वर्ग सुरु झाले आहेत. सेमी इंग्लिशच्या शाळांमध्ये एकूण 147 विद्यार्थी वाढ झालेले आहेत.
महापालिका शाळेत पुढील उपक्रम राबविले जात आहेत
1. मॉडेल स्कूल निर्मीती करुन सेमी इंग्लीश साठी पर्याय उपलब्ध करुन दिला
2. गणवेश-सेमी इंग्लीशच्या विद्यार्थ्यांना आकर्षक मोफत गणवेश उपलब्ध करुन दिला
3. प्रायोगिक स्वरुपात विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करुन दिले
4. सेमी इंग्लीश साठी तज्ज्ञ प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध