प्रेस मीडिया वृत्तसेवा : सांगली : विजय हुपरीकर
सांगली दिनांक १६ ऑगस्ट :- बुधगाव बिसूर खोतवाडी या गावातील नागरिकांच्या मागणीनुसार तसेच होत असलेल्या मोठ्या वाहतुकी मुळे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पीय बजेट मधून २ कोटी ३० लाख रु.चा निधी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मंजूर करून आज सदर रस्त्याचा बुधगाव, बिसूर, खोतवाडी येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी आपण केलेल्या वचनपूर्ती नुसार सदर रस्ता मंजूर करून आणल्याबद्दल नागरिकांनी आमदार गाडगीळ यांचे आभार मानले व नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बुधगाव गावचे भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बुधगाव शहर अध्यक्ष संदीप गोसावी, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अशरफ वांकर, पंचायत समिती माजी उप सभापती विक्रम पाटील भाजपा नेते जयवंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र शिवकाले, बुधगावचे उपसरपंच सुखदेव गोसावी, माजी उप सरपंच दिलीप तारळेकर, विनायक शिंदे , शहर उपाध्यक्ष विवेक लुगडे, धनाजी पाटील, प्रकाश गोसावी, विकास पाटील, अविनाश पाटील, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, उत्तम सुतार, भाजपा महिला अध्यक्ष शुभांगी कोली, उपाध्यक्ष अश्विनी म्हेत्रे, भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष स्नेहलताई वहनुगरे, वैशाली शिंदे, गणपती साळुंखे. बिसूर गावचे सागर पाटील, सरपंच लीलावती पाटील, उपसरपंच जोतीराम घारगे, माजी सभापती संपतजी भगत, किसन पाटील, महेश कोळी, ग्रा.प.सदस्य सुवर्णा चव्हाण रामचंद्र पाटील, कमल घारगे, रेश्मा साळुंखे, लक्ष्मण घारगे, सलीम मुजावर, ग्रामसेवक संपतराव माळी, तलाठी वैशाली वाले, खोतवाडी गावचे सरपंच संजय सूर्यवंशी, पी.सी.पाटील, संतोष निकम, पिंटू गुरव, निलेश पाटील, आनंदा पवार, श्रीकांत पवार, जालिंदर जगताप, रामचंद्र भोसले, रंगराव साळुंखे, निलेश पाटील, दिवाकर भोरे, चंदू आण्णा मुळीक, मेजर आनंदा कांबळे, सतीश कांबळे, उल्लास जगताप, बाळू कांबळे, भारत शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मुजावर तसेच ठेकेदार अभिजित गुंजाटे आदी मान्यवर पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.