तुळजाई नगर मधील अपूर्ण राहिलेली कामे आणि इतर समस्या याबाबत निवेदन देण्यात आले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : विजय हुपरीकर : 

सांगली :  आज 25 ऑगस्ट 2021 रोजी सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त मा.नितीन कापडणीस साहेब यांच्याबरोबर महापालिकेमध्ये मीटिंग घेण्यात आली. त्यांना तुळजाई नगर मधील अपूर्ण राहिलेली कामे आणि इतर समस्या याबाबत निवेदन देण्यात आले .

या प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक मा. श्री विष्णू माने मा. श्री राजेंद्र कुंभार हे उपस्थित होते. मा. आयुक्तांनी  आपले सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर येत्या सोमवारी तुळजाईनगर भागात दुपारी चार वाजता भेट देण्याचे नियोजन केले आहे .या वेळी आपण सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती .

आजच्या भेटीप्रसंगी तुळजाई नगर मधील सर्वश्री प्रकाश पाटील, श्रीकांत पाटील,मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय हिरेमठ, सचिन वाघमोडे, अरुण जोशी,वैभव कुलकर्णी,  संजय यादव, अमित शितोळे इ. नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post