राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी बैठकीत नगरसेवकांच्या 'ऑफ लाईन' सभेला सकारात्मक प्रतिसाद



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पुणे  :  कोरोनाचे निर्बंध काहीसे शिथिल झाले असताना महापालिकेच्या  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी बैठकीत नगरसेवकांच्या 'ऑफ लाईन' सभेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शक्यता वाढली आहे.

कोरोनामुळे फिजिकल डिस्टसिंग राखण्यासाठी सर्वच सभांवर बंधने आली आहेत. मागीलवर्षी मार्चपासून अशी परिस्थिती राहिल्याने मध्यंतरीच्या काही सभांचा अपवाद वगळता, पालिकेच्या सर्वसाधारण सभाही ऑनलाईनच झाल्या आहेत. या सभांमध्ये सहभागी होण्यात तसेच सर्वसाधारण सभेच्या नियंमांची पूर्तता करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी सर्वच सदस्यांकडून येत आहेत.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकिसाठी प्रारूप वॉर्ड रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर दीर्घकालीन परिणाम करतील असे मोठे प्रकल्प आणि धोरणात्मक निर्णय ऐरणीवर आणले आहेत. यापैकी अ‍ॅमेनिटी स्पेस  भाडेकराराने, महापालिकेच्या मालकीचे फ्लॅट विक्री, इ बाईक साठी चार्जिंग स्टेशन, अधिकाऱ्यांसाठी इ चालकांसह वहाने भाडेतत्वावर घेणे, नदी काठ सुधार योजना, जायका नदी सुधार योजना, समाविष्ट गावातील ड्रेनेज लाईन हे निर्णय हजारो कोटी रुपयांच्या 'उलाढालीचे' आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी विरोधकांची देखील आहे. परंतु ऑनलाईन सभेत येणाऱ्या अडचणी मुळे परिणामकारक मुद्दे मांडताना अडचणी येतात. तसेच एखादया निर्णयावर पक्षातील सदस्य व वरिष्ठांसोबत संवाद साधण्यात अडचणी येतात. यामुळे अनलॉक होत असताना कोरोनाने सर्व नियम पाळून सर्वसाधारण सभा ऑफ लाईन घेण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी यासंदर्भात येत्या आठवड्याभरात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस'च्या एका वरिष्ठ नगरसेवकाने दिली. सभाही ऑफलाईन पद्धतीने होतील अशी चिन्हे आहेत

Post a Comment

Previous Post Next Post