सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्येस जबाबदार धरत खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी विद्या पोखरकर यांचे निलंबन.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 


पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात जाळून घेत आत्महत्या करणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्येस जबाबदार धरत खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान सुरेश यांना पत्ता बदलून आणा असे म्हणल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही व ते नैराश्यात गेले असे म्हंटले आहे. निलंबनाचे आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिले आहेत.

पोलीस शिपाई विद्या पोखरकर असे निलंबन केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विद्या पोरखकर खडकी पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. १ ते २२ जुलै २०२१ या कालावधीमध्ये चारित्र्य पडताळणी कर्तव्यावर होत्या. त्यावेळी सुरेश पिंगळे यांनी चारित्र्य पडताळणी खडकी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. पण, त्यांना चारित्र्य पडताळणी न करुन देता खडकी पोलीस ठाण्यात चकरा मारायला लावल्या. तसेच त्यांचेवर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांचेवर गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्यांचे चारित्र्य पडताळणीचे व्हेरीफिकेशन करुन दिलेले नाही. 

तो अर्ज २२ जुलै रोजी पुढील कार्यवाहीसाठी पोलीस विशेष शाखा येथे पाठविला आहे. त्या दरम्यान त्यांनी सुरेश पिंगळे यांना तुमचे व्हेरीफिकेशन होणार नाही, तुमचा पत्ता चुकीचा आहे. तुम्ही पत्ता बदलून आणा, असे सांगत त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचे व्हेरीफिकेशन न झाल्याने कंपनीने त्यांना कामास येण्यास बंदी केली. यासह इतर करणामधून त्यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी स्वत:चे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याला महिला पोलीस कर्मचारी यांचे कर्तव्यार्थ बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा करुन कसुरी केलेली आहे. पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन व बेजाबादारपणाचे असल्याने त्यांना निलंबत करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post