लोणी काळभोर पोलीस ठाण्यातंर्गत विविध गंभीर गुन्ह्यातील टोळीला दोन वर्षांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यातंर्गत विविध गंभीर गुन्ह्यातील टोळीला दोन वर्षांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.प्रणव भारत शिरसाठ (वय 20 रा. लोणी स्टेशन, आंग्रेवस्ती), अभिजीत अभिमन्यु आहेरकर (वय 20) आणि सौरभ गोविंद इंगळे (वय २१ रा. इराणीवस्ती, लोणी स्टेशन ) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठी आणि त्याचे दोन साथीदार लोणी काळभोर गाव व परिसरात कोयता, कुऱ्हाड व इतर घातक शस्त्रे बाळगून नागरिक, व्यापारी व इतर सर्वसामान्य लोक यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करून, त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे लुबाडत होते. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी दिल्या होत्या.

टोळीची लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसर, लोणी स्टेशन, परिसरात दहशत होती. त्यानुसार टोळीला दोन वर्ष तडीपार करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, गणेश भापकर, मल्हार ढमढेरे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post