प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : वॉशिंग्टन येथील सीव्हीपी इन्कॉर्पोरेटेड (कस्टमर व्हॅल्यू पार्टनर) कंपनीला 'फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी अवॉर्ड ' मिळाले आहे. मूळचे पुण्याचे असलेले अमेरिकास्थित उद्योजक अनिरुद्ध कुलकर्णी यांचा या पुरस्कारामुळे अमेरिकेत गौरव झाला आहे.२०२१ या वर्षातील अमेरिकेतील वेगवान प्रगती करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल हा सन्मान सलग अकराव्यांदा प्राप्त झाला आहे.आरोग्य,राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समस्या सोडवून त्यांना धोरणविषयक,तंत्रज्ञान,व्यवसाय,सायबर सुरक्षा,डेटा सायन्स विषयक सल्लासेवा देण्याचे काम ही कंपनी करते .
सीव्हीपी इन्कॉर्पोरेटेड ही उद्योगव्यवसायांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सल्लासेवा देणारी कंपनी अनिरुद्ध कुलकर्णी यांनी पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थापन केली असून ते पुण्याच्या 'कामायनी' संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रीलेखा कुलकर्णी आणि कॅन्सर तज्ञ डॉ.अरविंद कुलकर्णी यांचे पुत्र आहेत.'अमेरिकेतील सन्मान ही आमच्या कामाची पावती असून अमेरिकेच्या उद्योगविश्वात आम्ही आम्ही दिलेल्या योगदानाचा यामुळे गौरव झाला आहे. उद्योगविश्वाला नव्या दिशा आणि अत्याधुनिक तंत्र ,सल्लासेवा देण्याचे काम आणखी वेगवान होऊ शकेल',असे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले.
अनिरुद्ध कुलकर्णी यांचा जन्म शिकागो,अमेरिके मध्ये 1964 यावर्षी झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील चॅम्पियन स्कूल येथे झाल्यानंतर ते परत पुढील शिक्षणासाठी कॅनडा आणि नंतर अमेरिका येथील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश मिळवून कॉम्प्युटर आणि ऑपरेशन रिसर्च या विषयात एम एस झाले.अमेरिकेत काही वर्षे नोकरी झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग अमेरिकेत उभारण्याचे ठरवून त्यांच्या पत्नी सौ प्रिया यांची साथ घेऊन सी व्ही पी कंपनी अमेरिकेत स्थापन केली. अनिरुद्ध कुलकर्णी या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ म्हणून काम करतात.