लोकजनशक्ती पार्टीची रेशनसाठीची मशाल निदर्शने तूर्त स्थगित



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीमार्फत वितरित होणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या   मागणीकरीता  लोकजनशक्ती पार्टीने  १४ ऑगस्ट रोजी आयोजित केलेली मशाल निदर्शने तूर्त स्थगित करण्यात आली आहेत.

नव्याने रुजू झालेले अन्नधान्य पुरवठा अधिकारी सचिन ढोले यांनी या प्रकरणाची दखल घेण्याचे आश्वासन आज पक्षाच्या पदाधिकाऱ्याना  दिले. लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट ,सरचिटणीस के. सी. पवार, संघटक आप्पा पाटील उपस्थित होते. 

 कोविड साथीच्या काळात गरजू ,गरिबांसाठी केंद्राकडून आलेले मोफत धान्य  वितरित न होता काळ्या बाजारात जात असल्याचा आरोप करून पक्षाने सातत्याने आंदोलने केली होती. अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी , शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी , सर्व रेशनिंग दुकानदार यांची  चौकशी करून दोषी वर  कारवाई करण्यात यावी, यासाठी पक्षाने सतत पाठपुरावा केला होता . 


एरिया सभा मागणीसाठी १७ ऑगस्ट रोजी पालिकेत  ठिय्या आंदोलन .


पुणे :नागरिकांना पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान देणाऱ्या एरिया सभेच्या नियमित आयोजनाच्या मागणीसाठी आज (शुक्रवारी ) विभागीय उपायुक्त श्रीकांत पाटील यांना विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदन देण्यात आले. असलम इसाक बागवान (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ) ,क्षेत्रसभा -एरीया सभा समर्थन मंच) 

इब्राहिम खान (एन ए पी एम, स्वराज आघाडी) ,सचिन आल्हाट  (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, स्वराज अभियान), राजू सय्यद (इनक्रेडिबल समाजसेवक  ग्रुप, क्षेत्रसभा (एरीयासभा समर्थन मंच) इत्यादी या चर्चेत आणि निवेदन देताना उपस्थित होते.यावेळी विभागीय उप आयुक्त श्रीकांत पाटिल यांनी या  शिष्ट मंडळाशी विस्तृत चर्चा करून यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन  दिले. दरम्यान ,१७ ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या मागण्या मान्य करून निर्णय घेतला जावा यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे असलम बागवान यांनी सांगितले . 

26 जुलै रोजीचे  धरणेआंदोलन व 6 ऑगस्ट रोजी केलेले स्मरण आंदोलनास प्रतिसाद न मिळाल्याने 17 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे

महानगरपालिका मुन्सीपल अधिनियम 1949 च्या नियमांचे पालन करून कलम 29/क/2/1 नुसार क्षेत्रसभा न घेतलेल्या प्रभाग 27 चे नगरसेवक अनुक्रमे अ ब क ड. यांचा राजीनामा घेण्या संदर्भात  तसेच पुणे मनपा विज विभाग, पथ, उद्यान, आकाशचिन्ह चा महसूल तसेच लाखो रुपयांची विजचोरी प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक गफुर पठाण यांनी केलेली असताना आज पर्यंत त्याच्यावर सर्व पुरावे सीसीटिव्ही  फुटेज देवूनहि का कारवाई केले गेली नाही म्हणून  महानगरपालिका मुन्सीपल अधिनियम    1949 च्या 36/3 नुसार पुणे मनपा च्या संबधित आयुक्त उप आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे .तसेच शहरविद्रपीकरण करणारी संकल्पना फलके कोणाच्या ठरावाने संमत झाली ,वॉर्डातील होणारी कामे जनतेला विचारात घेऊन केलेली आहेत की नाही,कामाच्या ठिकाणी ठेकेदार फलके न लावताच महिनोनमहिने चाललेल्या विकासकामां संदर्भातील निवेदन विभागीय उपआयुक्त यांना विधानभवन येथे देण्यात आले आणि पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post