प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे | कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वकाही बंद होतं. मात्र, राज्य सरकारने आता निर्बंधांमध्ये शिथीलता देत हळूहळू सर्वकाही अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांना ठाकरे सरकारने शिथीलता दिली आहे. मात्र, अद्याप पुण्यात निर्बंध लागू आहेत. यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांसह जनतेमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच पुणे शहरात दुकाने उघड ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवत राज्य सरकारचे सर्व आदेश धुडकावून लावले आहेत. पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकीत पुण्याला कोरोना निर्बंधातून शिथीलता देण्याविषयी चर्चा पार पडल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याला कोरोना निर्बंधातून शिथीलता देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे लवकरंच पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असं बोललं जात आहे.
दरम्यान, पुण्याला कोरोना निर्बंधातून शिथीलता देण्यात यावी, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे