कोंढवा खुर्द-मिठानगर प्रभाग क्र.27 करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  मजहर शेख : 

पुणे  - कोंढवा खुर्द-मिठानगर प्रभाग क्र.27 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड.गफूर पठाण यांच्या वतीने तसेच पुणे मनपा व जीविका हेल्थ केअरच्या माध्यमातून झोपडपट्टी कार्यक्षेत्रात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

समतानगर येथे झालेल्या या मोहिमेत सकाळी 11 वाजल्यापासून सुमारे 200 नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. घराजवळच लसीकरण केंद्र आल्याने नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला व नागरिकांनी नगरसेवक पठाण यांचे आभार मानले. इम्तियाज शेख, जावेद पठाण, उत्तरेश्‍वर शिंदे,बाबा शेख व दी मुस्लिम फाउंडेशनने डॉक्‍टरांना सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post