प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : नागरिकांना पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान देणाऱ्या एरिया सभेच्या नियमित आयोजनाच्या मागणीसाठी मंगळवारी पुणे महापालिकेच्या गेटवर सकाळी साडेअकरापासून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
असलम इसाक बागवान (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ) ,क्षेत्रसभा -एरीया सभा समर्थन मंच) इब्राहिम खान (एन ए पी एम, स्वराज आघाडी) ,सचिन आल्हाट (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, स्वराज अभियान), राजू सय्यद (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, क्षेत्रसभा (एरीयासभा समर्थन मंच), इम्रान घोडके, वीणा कदम, बदी उद्दमान खान, रियाझ बागवान इत्यादी उपस्थित होते
१७ ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या मागण्या मान्य करून निर्णय घेतला जावा यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
26 जुलै रोजी धरणे आंदोलन व 6 ऑगस्ट रोजी केलेले स्मरण आंदोलनास प्रतिसाद न मिळाल्याने 17 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिका मुन्सीपल अधिनियम 1949 च्या नियमांचे पालन करून कलम 29/क/2/1 नुसार क्षेत्रसभा न घेतलेल्या प्रभाग 27 चे नगरसेवक अनुक्रमे अ ब क ड. यांचा राजीनामा घेण्या संदर्भात तसेच पुणे मनपा विज विभाग, पथ, उद्यान, आकाशचिन्ह चा महसूल तसेच लाखो रुपयांची विजचोरी प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक गफुर पठाण यांनी केलेली असताना आज पर्यंत त्याच्यावर सर्व पुरावे सीसीटिव्ही फुटेज देवूनहि का कारवाई केले गेली नाही म्हणून महानगरपालिका मुन्सीपल अधिनियम 1949 च्या 36/3 नुसार पुणे मनपा च्या संबधित आयुक्त उप आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती .तसेच शहरविद्रपीकरण करणारी संकल्पना फलके कोणाच्या ठरावाने संमत झाली ,वॉर्डातील होणारी कामे जनतेला विचारात घेऊन केलेली आहेत की नाही,कामाच्या ठिकाणी ठेकेदार फलके न लावताच महिनोनमहिने चाललेल्या विकासकामां संदर्भातील निवेदन विभागीय उपआयुक्त यांना विधानभवन येथे देण्यात आले आणि पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आले होते.