ब्रेकींग न्युज : वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्डमध्ये डॉ. तुषार निकाळजे यांची नोंद

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

   पुणे :  डॉ. तुषार निकाळजे यांचे  "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी "हे  पुस्तक प्रकाशित झाले आहे .हे पुस्तक ब्रेल- इंग्रजी ,हिंदी ,उर्दू, इंग्रजी ,मराठी या पाच भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. विद्यापीठांच्या निरनिराळ्या विभागांच्या कामकाजाची माहिती देणारे हे पुस्तक आहे. या शैक्षणिक पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. डॉ. तुषार निकाळजे यांना शैक्षणिक क्षेत्रात "ट्रेंड सेटर" म्हणून ओळखले जाते.                                               

 ब्रेल -इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक ब्लाइंड मेन्स असोसिएशन, पुणे आहेत. मराठी पुस्तकाचे प्रकाशक हरिती पब्लिकेशन ,पुणे आहे. इंग्रजी- हिंदी -उर्दू या एकत्रित भाषांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रेस मीडिया (महाराष्ट्र व कर्नाटक) आहेत. डॉ.तुषार निकाळजे यांना वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्र, पदक व पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post