प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर हिरा हाईट्स सोसायटी तील फ्लॅट मध्ये चोरट्यांनी रोख रोकड व सोन्याचे दागिने असा एक लाख ७६ हजारांचा किमती ऐवज लंपास केला. सदरची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी सिकंदर सय्यद (वय ४० . राहणार कोंढवा खुर्द साईबाबा नगर ) यांनी फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक ए. के. चाऊस तपास करीत आहेत.