प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त लोक जन शक्ती पार्टी महीला आघाडी च्या वतीने अनाथ मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
दि.15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वतंत्रनिमित्त लोक जन शक्ती पार्टी महीला आघाडी च्या सरचिटणीस सौ.कल्पना जगताप यांच्या वतीने कन्या आधेष्यना हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शंभूराजे प्रतिष्ठान संचलीत शंभूराजे अनाथाश्रम, हडपसर पुणे येथील अनाथ मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी कल्पना जगताप म्हणाल्या घरात वाढदिवस साजरा केला तर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद आज या अनाथ मुलांच्या चेह-यावरील हसू पाहून झाला.विद्यार्थ्यांसाठी ज्या शासनाच्या योजना आहेत त्या या अनाथ मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करू.
सदर प्रसंगी पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, सरचिटणीस के.सी.पवार ,गायक अमर पुणेकर, श्रीमती प्रमिला कांबळे, अरूणा ताई इ.मान्यवर उपस्थित होते.