खेड तालुक्यातील घटना पती, सासु व भोंदूबाबा वरती गुन्हा दाखल



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

चाकण,खेड दि. ३०-: मुलगा मुलगी भेदभाव न करता व बेटी बेटा समान चा नारा देत असताना समाजात आज ही मुलगा होत नसल्याने पती व सासु ने भोंदूगिरी करत सुनेला मुलगा होत नाही म्हणून सुनेला विवस्त्र करून भोंदूबाबा कडून आणलेल्या हळद कुंकू लावण्याचा अत्यंत धक्कादायक घटना खालुम्ब्रे खेड तालुक्यात घडली आहे. लग्नानंतर दोन्ही मुली झाल्याने वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबा कडून आणलेला अंगारा आणि हळदी कुंकू फासले. अघोरी कृत्य करणाऱ्या पती सासू आणि भोंदू बाबाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेला दोन मूली झाल्या होत्या या कारणावरून तसेच मुलगा नसल्याचा कारणावरून  वंशाला दिवा हवा असा पती आणि सासू चा आग्रह होता त्यामुळे ते विवाहितेवर नेहमी अत्याचार करत होते. 

पती आणि सासू दोघे मावळ तालुक्यातील कामशेत येथे एका भोंदू बाबाकडे पीडितेला घेऊन गेले व भोंदूबाबा समोर पीडित महिलेला बसवल्यावर बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून तोंडाने मंत्र पुटपुटत हिशेब केल्याचे हातवारे केले. फिर्यादीला मुलगा होण्यासाठी अंगारा खाण्यासाठी दिला, तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला. 

भोंदू बाबाने सांगितल्याप्रमाणे पती आणि सासूने महिलेला विवस्त्र केले त्यानंतर पीडित फिर्यादीच्या शरीरावर अंगारा व हळदी कुंकू लावले. आपल्या सोबत घडलेल्या या प्रकारामुळे महिला खूपच घाबरली शेवटी हिम्मतीने स्वतःहुन तिने खेड तालुक्यातील माळुंगे पोलीस चौकीत धाव घेतली. आपल्या सोबत घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सर्व कर्मकांडाचे हकीगत सांगितले. पोलीसांना माहिती देताच त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीवर जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम ३,नुसार तसेच मानसिक छळ, विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधििक पुढील तपास चाकण पोलिस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post