प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : भारती विद्यापीठाच्या 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ('आयएमईडी') च्या एमबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या २०२१ या शैक्षणिक वर्षाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा 10 दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम इंडक्शन प्रोग्रॅम २६ जुलै ते ५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पार पडला . या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची ओळख करून देण्यात आली ,अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून सांगितली गेली, तसेच समुपदेशन करण्यात आले. मायक्रोसॉफ्ट टीम्स द्वारे हा इंडक्शन प्रोग्रॅम ऑन लाईन पार पडला.
'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट 'आयएमईडी' चे संचालक तसेच भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर, एमसीए अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. अजित मोरे , डॉ प्रवीण माने ,डॉ सोनाली खुर्जेकर ,डॉ सोनाली धर्माधिकारी ,डॉ नेताजी जाधव ,डॉ इंगवले,रंजना जाधव ,प्राध्यापक वर्ग ,समन्वयक यांनी हा इंडक्शन प्रोग्रॅम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले .10 दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मधून डॉ. सचिन वेर्णेकर,डॉ पवन अगरवाल (मुंबई ), अनुपमा जवळगी, आसावरी भावसार, संगीता शरद, वृंदा वाळिंबे,रिंकू नागपाल, निरंजन सिंग यांनी एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ.अजित मोरे,प्रसाद देशपांडे ( झेन्सार टेक्नाँलॉजी ), मंदार भिंगारकर (पर्सिस्टंट टेक्नाँलॉजी ), धनंजय गोखले, संजीव सोमणी, गीतिका पालिवाल, संगीता शरद, देविका थोरात यानी एमसीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .एमबीए,एमसीए या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी 10 दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मध्ये उपस्थित होते.
डॉ पवन अगरवाल यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट विषयाचे मार्गदर्शन केले .ते म्हणाले, 'कामाप्रती वचनबद्धता,प्रामाणिकपणा हे मुंबईच्या डबेवाल्यांच्या यशाचे गमक आहे . वेळेचे व्यवस्थापन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.' डॉ सचिन वेर्णेकर म्हणाले,'उद्योग जगताचे नवे नेतृत्व व्यवस्थापन शास्त्राच्या अध्यापनातून घडविण्यासाठी आयएमईडी वचनबद्ध आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे गुण पुढे आणणाऱ्या संधी त्यांना दिल्या जातील'.