प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : सह्याद्री डोंगररांगांमध्ये जुने वृक्ष सांभाळून ठेवणाऱ्या देवराई या संकल्पनेकडून प्रेरणा घेत पुण्यात बाणेर टेकडीवर रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थतर्फे संलग्न रोटरी क्लब आणि वसुंधरा अभियान या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने 'रोटराई' हा पर्यावरण संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.रविवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.
रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा,रोटरीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर रूपानी,रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्ष मनीषा कोनकर,रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटीच्या अध्यक्षा किरण राव,रोटरी क्लब ऑफ वारजेचे अध्यक्ष हेमंत जोशी,तसेच वसुंधरा अभियान या स्वयंसेवी संस्थेचे विश्वस्त पांडुरंग भुजबळ, गिरीश कोनकर, मोहन पुजारी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते..रोटरी क्लब सदस्यांनी आणि वसुंधरा अभियानच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपण केले.या पर्यावरण संवर्धन आणि जैववैविध्य राखणाऱ्या प्रकल्पामध्ये सह्याद्री डोंगर रांगांमध्ये येणारी स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात येत आहेत.पाच हजार झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी सहा फूट उंच रोपे,सेंद्रिय खत,सुरक्षा सामग्री,पाणी पुरवठा,पर्यावरण पूरक सामग्री पुरवण्यात आली आहे,असे मोहन पुजारी आणि गिरीश कोनकर यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी खर्चाचे धनादेश पांडुरंग भुजबळ यांना सुपुर्त करण्यात आले. यावेळी रोटरी सदस्यांनी वाढदिवसानिमित्त सुध्दा वृक्षारोपण केले.