प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़ अजमेरा, मासुळकर कॉलनी पुन्हा नव्याने लखलखित वाचा कारणअजमेरा येथील वस्तू उद्योग कॉलोनीतील 40 वर्षांहून अधिक जुने झालेले इमारतींची पडताळणी महानगरपालिकेकडून केली जात आहे, यात जे इमारत मजबूत नसतात अथवा धोकादायक असतात त्या इमारतींना / सोसायटींना नोटीस देऊन पुन्हा नव्याने बांधकाम करणायचे आदेश दिले जाते, तर काही सोसायटी आपल्या स्वखुशीने वाढलेल्या F.S.I. (जास्त बांधकाम करण्याची क्षमता) मुळे एक मोठं घर मिळावं यासाठी बांधकाम करतात अथवा बिल्डर /डेव्हलपर ला सोपवून बांधून घेतात.या मध्ये बिल्डर आणि मुळ सोसायटी धारक या दोघांना याचा फायदा होतो. याच पद्धतीने अजमेरा, मासुळकर कॉलनी येथील वास्तू उद्योग सोसायटीच्या फ्लॅट धारकांनी याची सुरुवात केली आहे.
वास्तू उद्योग येथील फ्लॅट धारकांना या वाढलेल्या FSI मुळे बिल्डर कडून 1 ऐवजी 2BHK घरं मिळणार आहेत. अजमेरा येथील ही पहिली सुरुवात असून इतर सोसायटी देखील यासाठी इच्छूक आहेत असे दिसून येत आहे.नव्याने पुनर्वसन होत असल्याने अजमेरा येथील इमारती सध्यापेक्षा अधिक मोठ्या आणि आकर्षक होतील तसेच इतर नागरिकांनाही येथे फ्लॅट घेण्याची संधी मिळेल. यामुळे अजमेरा – मासुळकर कॉलनी हे नव्याने पुन्हा चमकनार ही बाब नाकारता येत नाही.