प्रेस मीडिया वृत्तसेवा : हाफीज अनवरअली :
पिंपरी चिंचवड़ दि.२९ ऑगस्ट पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.अंतर्गत विविध पदांसाठी ३९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करु शकता.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या https://www.pmpml.org या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.व ऑफलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्यासाठी आवक जावक विभाग पी.एम.पी.एम.एल कार्यालय स्वारगेट या पत्ता वर ३१ ऑगस्ट पर्यंत पाठवावे.
अपरेंटिस मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक,मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर,ऑटो इलेक्ट्रीशियन वेल्डर,पेंटर,मेकाट्रॉनिक्स रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक,सुतार,प्लंबर,मसान , वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर या पदांची भरती करण्यात येणार आहे.तरी या पदासाठी इच्छुकांनी अर्ज करावे.