प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड आर.टी.ओ.चे पिंपरी वल्लभनगर येथील परीक्षण केंद्रामध्ये एकाच वेळी ड्रायव्हिंग टेस्ट देण्ययासाठी नागरिकांची सतत गर्दी होत असते.टेस्ट साठी आलेल्या नागरिकांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते आणि बसण्यासाठी योग्य जागा सुद्धा नाहीत. उन्हात उभे राहावे लागते , पाऊस आल्यावर सगळ्या नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होते ज्यामुळे कोरोनाचे संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते.
या बाबत पिंपरी चिंचवड आरटीओ प्रशासनाने नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून जागोजागी बसण्याचे व्यवस्था केली पाहिजे असे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.
Tags
Latest