अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवडचे विद्यमान महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते महापालिका भवनात माहिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
माहिती कक्ष महापालिका भवनातील तळमजल्यावर सुरू केले आहे.या माहिती कक्षात नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,व इतरांना पालिके संदर्भातील विविध माहिती दिली जाणार आहे. तरी नागरिकांनी काही माहिती हवी असल्यास माहिती कक्षाशी संपर्क करावे.असे आव्हान महापौर उषा ढोरे यांनी केले.यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,आयुक्त राजेश पाटील, क्षेत्रीय समिती अध्यक्षा शर्मिला बाबर,सुरेश भोईर,माजी महापौर योगेश बहल,अपर्णा डोके , नगरसेवक विलास मडिगेरी, केशव घोळवे,नगरसेविका मीनल यादव,अनुराधा गोरखे,सुजाता पालांडे,शारदा सोनवणे,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,उल्हास जगताप आदी उपस्थित होते .