प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शहरातील जनतेला विश्वासात न घेता , त्यांची मते जाणून न घेता शिस्तीच्या नावावर प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर पे अँड पार्किंग धोरण लागू केले . यामुळे शहरातील जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे. अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त , महापौर , विरोधी पक्षनेते ,सत्तारूढ पक्षनेते व सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याना पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासाठी निवेदन दिलेले असून अनेक आंदोलनेही केली आहेत. भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनाही संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले होते. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयावर शनिवार दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजी संघटनेच्या वतीने " असहयोग आंदोलन " करण्यात आले.
भाजपच्या शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी कार्यालयासमोरच ठिय्या मांडला व जोपर्यंत आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याची आक्रमक भूमिका संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी घेतली. भर पावसात सुद्धा आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने शहरातील अनेक सामाजिक संघटना यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.पावसामध्ये सुद्धा आंदोलनाची धार वाढत असल्याचे लक्षात येताच भाजपच्या शहरातील नेत्यांना आंदोलकांपुढे अखेर नमते घ्यावे लागले . संध्याकाळी *आमदार महेश लांडगे यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व पे अँड पार्किंग रद्द करण्यासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा करून येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित केले . त्यांच्यामार्फत भाजपचे शहर सरचिटणीस बाबू नायर ,प्रदेश सचिव अमित गोरखे ,अर्जुन ठाकरे , फारुख इनामदार यांनी आंदोलनकाची भेट घेऊन आंदोलनकचे म्हणणे ऐकून घेतले व आपल्या मागण्या या रास्त असून याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगितले . सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पे अँड पार्किंग बाबत सकारत्मक निर्णय घेण्यात येईल* असे आश्वासन दिल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने भाजप कार्यालयावर सुरु असलेले आंदोलन रात्री उशिरा तात्पुरते स्थगित करण्यात आले.
सदर *आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर ,छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड , आनंदा कुदळे , भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ सरोदे , वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे ,राजन नायर ,एमाय एमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे ,अपना वतनचे सचिव दिलीप गायकवाड ,कार्याध्यक्ष हमीद शेख ,महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर ,तौफिक पठाण ,केशव बुडगल , संगीता शहा , हेमलता परमार , ग्राहक पंचायत चे अमोल उबाळे , ऍड मोहन अडसूळ ,योद्धा प्रतिष्ठान चे प्रमोद शिंदे , संकल्प फाउंडेशन चे गणेश जगताप , दीपक खैरनार ,लक्ष्मी कोळी , राष्ट्रवादी रिपब्लिकन सेनेचे माउली बोराटे , गणेश आहेर ,वेलफेयर पार्टी ऑफ इंडियाचे सालार शेख ,इमाम नदाफ ,कलीम शेख* यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सिद्दीकभाई शेख ,
संस्थापक ,अध्यक्ष ,अपना वतन संघटना
मो. ९६६५४८४७८६